Buddha Quotes in Marathi: ‘गौतम बुद्ध’ हे फक्त एक व्यक्तिमत्त्व नाही आहे तर एक अशी ज्योत आहे जी हजारो वर्षानंतर ही मानवी जीवनाचा सत्यमार्ग प्रकाशित करत आहे. आणि येणारा अनंत काल हा दिवा सदैव जळत राहील. त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आज हि दिशादर्शक आहेत त्यांच्यासाठी जे जीवनाच्या प्रवासात भरकटलेले आहेत.
मी असाच छोटा प्रयत्न करत आहे. त्यांचे काही अनमोल विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा. खरतर कोणत्याच लेखणीत एवढी क्षमता नाही कि या अनंत विचारधारेला लेखनात उतरवले जाईल. तरी या विचारांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे कि अंशतः स्पर्शाने हि ऊर्जा संचारते.
Buddha Quotes in Marathi – गौतम बुद्धांचे विचार
१)
प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो. प्रत्येक अनुभव महत्वपूर्ण आहे. कारण आपण स्वतःच्या चुकांमधूनच शिकत असतो. – गौतम बुद्ध
२)
प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे की तो स्वतःच्या दुनियेचा शोध स्वतः लावेल. – गौतम बुद्ध
३)
माणूस प्रत्येक दिवशी एक नवीन जन्म घेतो. प्रत्येक दिवस एक नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे म्हणून प्रत्येक दिवसाचे महत्त्व समजा. – गौतम बुद्ध
४)
हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक असा शब्द बरा जो शांती आणेल. – गौतम बुद्ध
५)
हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणे बरे, कारण तो विजय तुमचा असेल. त्याला तुमच्या पासून कोणीही कोणीही पासून कोणीही कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. – गौतम बुद्ध
६)
आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्याच्या जीवनावर चांगला वा वाईट प्रभाव पडू शकतो. – गौतम बुद्ध
७)
संशय करण्याची सवय फार धोकादायक आहे. संशय लोकांना विभक्त करतो. – गौतम बुद्ध
८)
शांती ही मनातून येत असते. शांती शिवाय कशाचा शोध नका घेऊ. – गौतम बुद्ध
९)
सत्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती दोन चुका करू शकते. एक तर पूर्ण मार्ग पार न न करणे; किंवा सुरुवातच न करणे. – गौतम बुद्ध
१०)
निश्चितपणे जे निराश विचारांपासून दूर असतात ते शांती प्राप्त करतात. – गौतम बुद्ध
११)
पायांना पाय असण्याची जाणीव तेव्हा होते; जेव्हा ते जमिनीवर असतात. – गौतम बुद्ध
१२)
निष्क्रिय होणे मृत्यूचा एक छोटा रस्ता आहे. मेहनती असणे समृद्ध जीवनाचा रस्ता आहे. मूर्ख लोक निष्क्रिय असतात. आणि हुशार लोक मेहनती. – गौतम बुद्ध
१३)
परमात्मा ने प्रत्येक माणसाला एकसारखे बनवलेले आहे. अंतर फक्त आपल्या मेंदूच्या आत आहे आहे. – गौतम बुद्ध
१४)
वाईटपणा नक्कीच असायला हवा. तेव्हाच चांगुलपणा त्याच्यावर आपली पवित्रता सिद्ध करू शकतो.
– गौतम बुद्ध
१५)
भूतकाळात अडकू नका. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका. वर्तमानात लक्ष केंद्रित करा. हा सुखी राहण्याचा मार्ग आहे. – गौतम बुद्ध
१६)
ध्येय गाठण्यापेक्षा जास्त जरुरी आहे कि तीथपर्यंतचा प्रवास योग्यरीत्या करायला हवा. – गौतम बुद्ध
१७)
मी कधी पाहत नाहि कि, काय केले गेले आहे. मी नेहमी हेच बघतो की काय करणे बाकी आहे. – गौतम बुद्ध
१८)
गेलेली वेळ पुन्हा परत नाही येत. आपण कायम हा विचार करतो की, आज काही काम अर्धवट राहिले असेल तर ते उद्या पूर्ण होईल. पण जो वेळ आता निघून गेला तो पुन्हा येणार नाहि. – गौतम बुद्ध
१९)
ज्याप्रमाणे एक मेणबत्ती आगीशिवाय स्वतःला जाळू शकत नाही. त्याप्रमाणे एक माणूस अध्यात्मिक जीवना शिवाय जिवंत नाही राहू शकत. – गौतम बुद्ध
२०)
इतरांसमोर काहीही सिद्ध करण्यापेक्षा हे जास्त जरूरी आहे. की आपण स्वतःला सिद्ध करू. प्रत्येक माणसाची प्रतिस्पर्धा आधी स्वतःशी असते. यासाठी दुसऱ्यांवर विजय प्राप्त करण्यापेक्षा जरुरी आहे आपण आधी स्वतःला जिंकू. – गौतम बुद्ध
२१)
आनंदाचा कोणता मार्ग नसतो. आनंदी राहणे हाच मार्ग आहे. – गौतम बुद्ध
२२)
स्वस्थ आरोग्याशिवाय जीवन, जीवन नाही आहे. फक्त पीडा असलेली स्थिती आहे. मृत्यूची प्रतिकृती आहे. – गौतम बुद्ध
२३)
स्वतःचा उद्धार स्वता करा. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. – गौतम बुद्ध
२४)
निरोगी स्वास्थ्य मोठे बक्षीस आहे. आनंद सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि प्रामाणिकपणा सर्वात मोठा संबंध आहे. – गौतम बुद्ध
२५)
जर तुम्ही खरच स्वतःवर फार प्रेम करत असाल तर तुम्ही कधीच दुसऱ्यांना दुःख नाही देऊ शकत. – गौतम बुद्ध
२६)
आपण तसेच बनतो जसा आपण विचार करत असतो. म्हणून सकारात्मक विचार करा. आणि आनंदी रहा. – गौतम बुद्ध
२७)
आपण एकटे जन्माला येत असतो. आणि एकटेच मृत्यूला प्राप्त करत असतो. म्हणून आपल्या शिवाय आपल्या नशिबावर इतर कोणीही निर्णय नाही देऊ शकत. – गौतम बुद्ध
२८)
स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवणे ही एक कर्तव्य आहे. नाहीतर आपण आपले मन आणि विचार स्वच्छ ठेवू शकणार नाहि. – गौतम बुद्ध
२९)
तुम्ही पूर्ण ब्रह्मांडात कुठेही अशी व्यक्ती शोधून काढा; जी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करत असेल. तर तुम्हाला कळेल की, जेवढे तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता तेवढ तुमच्यावर अजून कोणीच नाही करू शकत. – गौतम बुद्ध
३०)
तुमच्या क्रोधित होण्यावर तुम्हाला दंड नाही दिला जाऊ शकत. कारण तुमचा क्रोध स्वतः तुम्हाला दंड देईल. – गौतम बुद्ध
बुद्ध अभ्यासावा आणि तो आत्मसात करावा. किंबहुना अभ्यासू स्वतः समर्पित होऊन जातो या मार्गावर. कारण इथेच त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. प्रस्तुत विचार वाचून स्वतः विचार करा. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे हि यात लपलेली असतील.
तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा.
धन्यवाद,
Most Important Post: